Old pension news : कर्नाटक काँग्रेसकडून जाहीरनाम्यात सत्तेत आल्यास पुन्हा “जुनी निवृत्तीवेतन योजना” लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या निवृत्तीवेतन योजनेस संसदेतच विरोध केल्याने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन साठी अनुकूल नाही असा प्रचार विरोधक करत आहेत.
जुनी पेन्शन योजना अपडेट्स
कर्नाटकात सुमारे नऊ लाख सरकारी कर्मचारी आहेत.हिमाचल प्रदेशप्रमाणेच काँग्रेसने प्रचारात जुन्या निवृत्तीवेतन योजनेवर भर दिला जातो आहे.हिमाचल प्रदेशात जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आणि त्यांची मते काँग्रेसला मिळाली होती.कर्नाटक राज्यातही जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचे आश्वासन देऊन काँग्रेसने भाजपची कोंडी केली आहे.
कर्मचारी व विरोधकांकडुन जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा मुद्दा प्रचारात तापविला जाईल याचा अंदाज आल्यानेच मुख्यमंत्री बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने निवृत्तीवेतन योजनेचा अभ्यास करण्याकरिता समिती नेमली होती.
Old pension scheme news
हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निकालावरून निवृत्तीवेतन योजनेचा मुद्दा राजकीयदृष्ट्या आगामी लोकसभा निवडणुकीत त्रासदायक ठरणार असल्याचा भाजपला अंदाज आल्याने,केंद्र सरकारने निवृत्तीवेतन योजनेचा अभ्यास करण्याकरिता समिती नेमली आहे.
धर्मनिरपेक्षा जनता दलाने सत्तेत आल्यास निवृत्तीवेतन योजनेचा फेरविचार करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे. हिमाचल प्रदेशप्रमाणे सरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची एकगठ्ठा मते मिळावीत, असा प्रयत्न जातो आहे.
हिमाचल प्रदेशात आश्वासन दिल्याप्रमाणे सत्तेत येताच जुनी निवृत्तीवेतन योजना लागू केल्याकडे काँग्रेसचे नेते एम. बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
जुन्या पेन्शन संदर्भात महाराष्ट्र कर्मचारी संघटनेची तातडीची बैठक