Employees Increment : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.बक्षी समितीच्या अहवालानुसार काही संवर्गातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लाभ देण्यास सुरुवात झाली आहे.
बक्षी समिती – आश्वासित प्रगती योजना
नोंदणी व मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधक वर्ग-२/सह जिल्हा निबंधक वर्ग-२ या संवर्गातील अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग पहिला लाभ मंजूर करण्यासंदर्भात शासन निर्णय दिनांक १५ मे २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
सुधारित वेतनश्रेणी होणार लागू
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग पहिला लाभ मंजूर करण्यासंदर्भात शासन आदेशान्वये नोंदणी व मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधक वर्ग-२ सह जिल्हा निवर्धक वर्ग-२ या संवर्गातील अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभाच्या सुधारित आश्वासित प्रगती पहिला लाभ मंजूर करण्यात आला आहे. वेतनश्रेणी – ९३००-३४८०० ग्रेड पे ५००० अशी करण्यात येणार आहे.
State employees increment updates
सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२३०५१५१७०११७०२१९ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
आश्वासित प्रगती योजना वेतनश्रेणी शासन निर्णय येथे पहा