State employees : कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयाकडून शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमासाठी तासिका तत्वावरील तसेच अभ्यागत अध्यापकांना अदा करावयाच्या मानधनाचे दर वाढवण्या संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
Government employees news
शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेले मानधनाचे दर सुधारीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.याबाबत सर्वागीन विचार करून खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयांकडून शिकविण्यात येणाऱ्या पदवी/ पदविका / पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी तज्ञ अभ्यागत / तासिका तत्वावरील अध्यापकांना प्रदान करावयाच्या मानधनाच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.सुधारीत दर दिनांक १ एप्रिल २०२३ पासून अमलात येणार आहे.
तासिका तत्वावरील अध्यापक/ तज्ञ अभ्यागत यांना निमंत्रित करण्यापूर्वी संस्थेतील संबंधित विद्याशाखेतील सर्व शिक्षकीय तसेच प्रशासकीय पदावर काम करीत असलेल्या शिक्षकांना प्रमाणकानुसार शैक्षणिक भार देण्यात आला आहे यांची खात्री महाविद्यालयाचे अधिष्ठाता / प्राचार्य करणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या GPF संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित;जमा होणार एवढे पैसे!
तासिका तत्वावर नेमणूक नियम
तासिका तत्वावरील उमेदवारास एकाच महीन्यात त्याच्या दर्जाच्या अनुज्ञेय वेतनश्रेणीतील सुरुवातीच्या वेतनश्रेणीच्या रकमेपेक्षा अधिक मानधन अदा केले जाणार नाही याची दक्षता संबंधित शासकीय कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि संचालक, कला संचालनालय यांनी घ्यावी.
सेवानिवृत्त अध्यापक वा संबंधित अभ्यासक्रमाशी निगडीत व्यवसायातील तज्ञ व्यक्ती यांना तासिका तत्वावरील अध्यापनासाठी निमंत्रित करण्यात यावे. कोणत्याही स्थितीत बॅक डोअर नियुक्ती” परिस्थिती उद्भवेल अशा उमेदवारांना या प्रयोजनासाठी निमंत्रित करण्यात येऊ नये.
कला महाविद्यालयाने संचालक, कला संचालनालय यांच्या मान्यतेने जाहीरात देऊन अध्यापकांची स्थानिक निवड समिती मार्फत निवड करावी.निवड समितीमध्ये संबंधित महाविद्यालयाचे अधिष्ठाता / प्राचार्य, विभागप्रमुख व एक बाह्य विषय तज्ञ असावा.
State Employees Maharashtra
तासिका तत्वावरील अध्यापकांची एका शैक्षणिक वर्षासाठी अधिकतम ९ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करता येईल. सदर नियुक्तीस कला संचालनालयाची मान्यता घेण्यात यावी. उपरोक्त ९ महिन्यांचा कालावधी संपुष्ठात आल्यानंतर ही नियुक्ती आपोआप संपुष्ठात येईल.
एका पुर्णवेळ रिक्त पदाकरीता फक्त दोनच तासिका तत्त्वावरील अध्यापकाव्या नेमणुका करता येतील. एका अध्यापकाकडे जास्तीत जास्त ०९ तासिकांचा कार्यभार सोपविता येईल.
प्रत्यक्ष उपलब्ध कार्यभार आणि तासिका तत्वावरील मानधन प्रदान याबाबत काही अनियमितता आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य / अधिष्ठाता यांची राहील.