DA Arrears : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचे आणि महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलो आहोत.मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, आपल्याला थकीत महागाई भत्ता, त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगातील जे पाच हप्ते पाडून दिलेले आहेत,त्याची रक्कम आपल्या पगारात जमा होत असते. आता या थकीत महागाई भत्ता आणि सातव्या क्रमांकातील भत्त्यांवरती आपल्याला आयकर मध्ये सूट मिळू शकते तर बघूया सविस्तर
Tax benefits on DA arrears
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कलम 89 अंतर्गत थकबाकीवर आयकर सूट मिळू शकते.आपण आयकर सवलतीसाठी दावा करू शकता.इन्कम टॅक्स सवलतीचा दावा करण्यासाठी तुम्हाला e-filling पोर्टल वर ऑनलाईन फॉर्म 10E भरणे आवश्यक आहे.
महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढतो
आपल्याला माहिती आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना साधारणपणे जानेवारी आणि जून जुलै या दोन महिन्यात मागे भत्तेमध्ये वाढ केली जाते परंतु या काही राज्यांमध्ये महागाई भत्तेतील फरक हा रोखीने देण्यात येतो आणि तो आपल्या बँक खात्यात जमा होतो अशा वेळेस या महागाई भत्त्याच्या फरकावर सुद्धा आपण आयकर सूट घेऊ शकतो.
अर्थतज्ञांचे मत काय आहे?
अर्थतज्ञांच्या मते, जर आपण कलम 89 अंतर्गत कराचा दावा केला तर तुम्हाला प्रथम फॉर्म 10E भरणे आवश्यक आहे.तुम्ही या फॉर्मशिवाय दावा केल्यास तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाकडून नोटीस सुध्दा मिळू शकते.नोटीसमध्ये असे कळविण्यात येईल की,फॉर्म 10E दाखल न केल्यामुळे तुम्हाला कलम 89 अंतर्गत सवलत देण्यात आलेली नाही.
आयकर सुट व फॉर्म 10E कसा सबमिट करायचा येथे पहा