Dearness allowance : महागाई ने त्रस्त असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी गृहिणींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये आता चार टक्के ऐवजी तीन टक्के वाढ करण्यात येणार आहे सदरील वाढ हे एक जुलै 2023 पासून पेन्शन धारक व सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
महागाई भत्ता कॅल्क्युलेटर
आम्ही तुम्हाला सांगतो की, जर सरकारने कर्मचाऱ्यांचा dearness allowance ३ टक्क्यांनी वाढवला तर तो ४५ % होईल.सरकार जानेवारी आणि जुलैमध्ये DA, DR 2 वेळा वाढवते, ही वाढ कामगार मंत्रालयाकडून दर महिन्याला जारी केलेल्या AICPI डेटावर अवलंबून असते. 6 महिन्यांच्या डेटाचे पुनरावलोकन केल्यानंतर DA आणि DR मध्ये वाढ.
DA कधी वाढणार?
सातव्या वेतन आयोग अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 42 % DA देण्यात येत आहे. तसेच निवृत्तीवेतनधारकांना DR % देखील दिला जातो आहे.
रक्षाबंधन आणि गणपती दरम्यान केव्हाही सरकार DA/ DR वाढवण्याची घोषणा करू शकते. महागाई भत्ता वाढीमुळे 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे.