पुन्हा अँटेना येणार! सेट टॉप बॉक्सशिवाय टीव्हीवर मोफत पाहता येणार २०० चॅनल्स, केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
केंद्र सरकार एक नवीन तंत्रज्ञान आणणार आहे.यामध्ये,टीव्हीच्या आत एक सॅटेलाइट ट्यूनर आधीच स्थापित केला जाईल.यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने संपूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे.सामान्य भाषेत सांगायचे झाल्यास,हा सॅटेलाइट ट्यूनर तुमच्या सेटअप बॉक्सप्रमाणे काम करेल परंतु आतापासून ते सामान्य टीव्हीमध्ये प्री-इंस्टॉल केले जाईल.
मोफत सेट टॉप बॉक्स योजना
केंद्र सरकार अशा योजनेवर काम करत आहे,ज्याद्वारे 200 वाहिन्या मोफत उपलब्ध होतील.केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून, त्यानंतर तुम्हाला टीव्हीमध्ये सेटअप बॉक्सची गरज भासणार नाही आणि तुम्हाला 200 चॅनल मोफत पाहायला मिळतील.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली
या इनबिल्ट सॅटेलाइट ट्यूनरसह,तुम्ही कोणत्याही अडचणी शिवाय 200 हून अधिक फ्री-टू-एअर चॅनेल पाहण्यास सक्षम असाल. तुम्हाला फक्त तुमच्या घरी अँटेना बसवावा लागेल जेणेकरून सिग्नल योग्य प्रकारे टीव्हीपर्यंत पोहोचू शकेल.
घरात बसवा स्वस्त सोलर जनरेटर आणि चालवा टिव्ही,पंखा आणि फ्रिज