Kubank Bank Fix Deposit : अलीकडे अनेक बँकांनी सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही देखील FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर प्रथम सर्व माहिती वाचा जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय घेता येईल.
बचत ठेव योजना व्याजदर कसा ठरवला जातो?
बँकांकडून एफडीवर दिले जाणारे व्याजदर गुंतवणूकदारांच्या श्रेणी आणि कार्यकाळानुसार दिला जातो.जेव्हा FbankD परिपक्व होते, तेव्हा मुद्दल आणि व्याज जोडून एकूण रक्कम गुंतवणूकदारांना दिली जाते.7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेवी ठेवता येतात.
बँक एफडी व्याजदर – जुन 2023
SBI Bsnk : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वसामान्य नागरिकांना FD वर 3 % ते 7.10 % व्याज देत आहे. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 ते 7.60 % व्याजदर आहे.
HDFC bank : देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँक सर्वसामान्य नागरिकांना एफडीवर 3 ते 7.25 % व्याज देत आहे. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांसाठी सध्या 3.50 ते 7.75 टक्के व्याजदर आहे.
ICICI Bank : आयसीआयसीआय बँक देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक बॅंक असून सामान्य नागरिकांना FD वर 3 % ते 7.10 % व्याज देत आहे. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 ते 7.60 % व्याजदर आहे.
PPNB Bank : देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक पंजाब नॅशनल बँक (PNB) सर्वसामान्य नागरिकांना FD वर 3.5 % ते 7.25% व्याज देत आहे. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 ते 7.75 % व्याजदर आहे.