Casual Leave : एखाद्या व्यक्तीला मदत करण्यासाठी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 42 दिवसांची विशेष नैमित्तिक रजा मिळणार आहे.एखाद्या कर्मचाऱ्याने अवयवदान केले तर ती एक मोठी शस्त्रक्रिया आहे.यासाठी रुग्णालयात दाखल करण्याबरोबरच बरे होण्यासही वेळ लागतो.
Employees Special Casual Leave
विद्यमान नियमांनुसार कॅलेंडर वर्षात जास्तीत जास्त 30 दिवसांची रजा प्रासंगिक रजा म्हणून मंजूर केली जाते. नवीन नियम 25 एप्रिल 2023 पासून लागू झाला आहे.रुग्णालयात दाखल करण्याबरोबरच बरे होण्यासही वेळ लागतो.बरे होण्यासाठी रजेची कमाल मर्यादा 42 दिवसांची असेल.
Casual Leave रजेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून नोंदणीकृत डॉक्टरांच्या शिफारशीनुसार सुट्टी देण्यात येणार आहे.कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल होण्याच्या एक आठवड्यापूर्वी या प्रकारची रजा मिळू शकते.
कर्मचारी नैमित्तिक रजा
सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,हा आदेश रजा नियमांतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही तर कर्मचाऱ्यांसाठी सदरील नियम लागू करण्यात येत आहे. सुट्ट्यांशी संबंधित नवीन नियम रेल्वे कर्मचारी,अखिल भारतीय सेवा कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही.
महागाई भत्ता वाढीचा नवीन फॉर्म्युला! आता एवढा वाढणार डीए