Da hike : राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचान्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
राज्य सरकारी महागाई भत्ता 4% वाढ
शासनाने असे आदेश दिले आहे की, दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३८ % वरून ४२% करण्यात यावा.
सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२३ से दिनांक ३१ मे २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे जून, २०१३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
Dearness allowance hike
महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात.
लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०६३०१८३२१४२२०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महागाई भत्ता 4 % वाढ पगारवाढ व फरक येथे पहा
Yaaaa