DDA hike news : नवीन आर्थिक वर्षातील बिहार मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत नवीन शिक्षक नियमावलीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली आहे. 38% टक्के महागाई भत्ता आता 42 टक्के करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांरी पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढ
मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या अजेंड्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.बिहारमध्ये महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.आता राज्यातील कर्मचाऱ्यांना ३८ ऐवजी ४२ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजेच चार टक्के वाढ झाली आहे.1 जानेवारी 2023 पासून लागू होईल.राज्य कर्मचार्यांसोबतच पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळणार आहे.
सध्याच्या DA वाढीनंतर पगार किती वाढला?
मार्चमध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ४ टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीचा थेट फायदा ४७.५८ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६९.७६ लाख पेन्शनधारकांना होत आहे.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा मासिक पगार सुमारे 42,000 रुपये असेल आणि मूळ वेतन सुमारे 25,500 रुपये असेल, तर त्याला/तिला महागाई भत्ता म्हणून 9,690 रुपये मिळतील. डीएमध्ये 4 टक्के वाढ केल्यानंतर 10,710 रुपये महागाई भत्ता देण्यात येत आहे. यामध्ये दर महिन्याला पगारात 1,020 रुपयांची वाढ झाली आहे.
महागाई भत्ता वाढ नियम बदलला, पहा आता किती वाढणार पगार