DA hike updates :- देशात पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार असल्या कारणाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आणि भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.थोडक्यात लवकरच महागाई भत्ता व घरभाडे भत्ता देखील वाढवला जाण्याची शक्यता असून तो 50% च्या पुढे जाईल अशी शक्यता आहे.
अर्थ मंत्रालय लवकरच घेणार निर्णय?
रेल्वे सीनियर सिटीजन वेल्फेअर सोसायटी अर्थात RSCWS ने अर्थ मंत्रालयाला निवेदन दिले आहे.निवेदनात केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी नवीन वेतन आयोगाची आवश्यकता का आहे?या संदर्भात सविस्तर माहिती दिली असून RSCWS ने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे 1 जानेवारी 2024 पासून आठवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी केली आहे.
नवीन वेतन आयोगाचा अहवाल आहे तो सादर करण्यासाठी सुमारे 2 वर्षाचा कालावधी लागतो,तसेच या अहवालावर विचार करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला आणखी 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागतो.या सगळ्या परिस्थितीमुळे आठवा वेतन आयोग लवकरात लवकर लागू करावा अशी मागणी निवेदनात केली आहे.
New pay commission updates
RSCWS ने निवेदनात म्हटले आहे की, सातवा वेतन आयोगाने कमीत कमी वेतन 26 हजार ऐवजी 18 हजार रुपये निश्चित केले असून फिटमेंट फॅक्टर 3.15 ऐवजी 2.57 असा चुकीच्या पद्धतीने प्रस्तावित करण्यात केला.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याचा महागाई भत्ता हा त्यांच्या मूळ वेतनाच्या 42% असून त्यात लवकर 4 % वाढ केली जाण्याची अपेक्षा आहे. या दृष्टिकोनातून 2024 च्या अखेरीस DA/DR लागू करण्यात येणार असून त्याचा दर 50% किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो.
1 thought on “DA Hike updates : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! ‘RSCWS’ ने अर्थ मंत्रालयाला दिले निवेदन;महागाई भत्ता 50 % च्या पुढे जाणार?”