Employees promotion : एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने प्रमोशन नाकारल्यावर अशा प्रकरणी कशा प्रकारे कार्यवाही करावी याबाबतचे आदेश दि. ३०.०४.१९९१ च्या शासन निर्णयान्वये दिलेले आहे.पदोन्नतीसाठी निवड झाल्यानंतर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने पदोन्नतीचे पद स्विकारण्यास नकार दर्शविल्यास त्याचे नांव पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या सेवकांच्या निवड यादीतून काढून टाकण्या येते.पण पुढे काय होते पहा सविस्तर
Government employees promotion news
अधिकारी / कर्मचारी वैयक्तिक कारणास्तव वारंवार पदोन्नती नाकारत असल्याचे आढळून आले आहे. शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या पदोन्नती नाकारण्याच्या प्रवृत्तीस आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शासन निर्णय निर्गमित केला आहे.
प्रमोशन झाल्यानंतर अथवा तत्पूर्वीच एखाद्या कर्मचाऱ्याने पदोन्नतीचे पद स्विकारण्यास नकार दिल्यास अशा कर्मचाऱ्यांचे नाव पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या निवड यादीतून काढून टाकण्यात येते.
पुढील दोन वर्षी होणान्या निवड सूच्यांमध्ये संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या नावाचा विचार न करता तिसऱ्या वर्षांच्या निवडसूचीत संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याची पदोन्नतीसाठीची पात्रता तपासण्यात येते.अशावेळी गुणवत्तेप्रमाणे संबंधित अधिकारी / कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरल्यास त्याचा नियमित निवडसूचीत समावेश करण्यात येतो.
कर्मचारी पदोन्नती नकार शासन निर्णय
ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पहिल्या वेळेस पदोन्नती नाकारल्यानंतर ३ वर्षानंतर दुसऱ्या वेळेस निवड सूचीकरीता विचार करण्यात आल्यानंतर संबंधित अधिकारी / कर्मचान्याने पुन्हा पदोन्नतीस नकार दिल्यास त्यांचा त्या निवडसूचीत व पुढील दोन वर्षांच्या निवडसूचीत विचार करण्यात येणार नाही.
पदोन्नती नाकारणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्याचा पदोन्नती नाकारण्या संदर्भातील अर्ज विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकापूर्वी प्राप्त झाल्यास किंवा पदोन्नतीचे आदेश निर्गमित केल्यानंतर देखील प्राप्त झाल्यास ते विचारात घेऊन संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव निवडसूचीतून वगळण्यात येते
आश्वासित प्रगती योजना लाभ नाही मिळणार
पदोन्नतीसाठी निवड झाल्यानंतर पदोन्नतीचे पद स्विकारण्यास नकार दिलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांची वरच्या पदावरील सेवाज्येष्ठता ही ज्यावेळी संबंधित अधिकारी / कर्मचारी पुढील निवडसूचीत (३ वर्षानंतरच्या) पदोन्नतीस पात्र ठरेल व प्रत्यक्ष पदोन्नतीच्या पदावर रुजू होईल त्या दिनांकापासून विचारात घेतली जाईल.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 4% वाढ! पहा डीए वाढ व फरक
Promotion नाकारलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजने अंतर्गत लाभ दिले असल्यास ते काढून घेण्यासंदर्भात वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांनुसार कार्यवाही करण्यात यावी.ज्या अधिकारी / कर्मचान्याने कायमस्वरूपी पदोन्नती नाकारलेली आहे. त्यांचा पुढील कोणत्याही निवडसूचीकरिता विचार करण्यात येत नाही.
पदोन्नती नकार शासन निर्णय येथे पहा