राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून राज्यात जुलै ते ऑक्टोबर 2022 दरम्यान अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 1200 कोटी रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023 मिळण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत,अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
Crop Insurance list 2023
जुलै ते ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाची मोठी हाणी झाली होती.शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना “अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान” जाहीर झाली होती.शासनाकडून मिळणारी मदत ही बँकांना वाटपासाठी न देता शासन थेट शेतकऱ्यांच्या खात्यात (MahaDBT) द्वारे जमा करण्यात येणार आहे.
सप्टेंबर ते ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पिक नुकसानीसाठी शासनाने जाहीर केलेल्या 12,68,008 शेतकऱ्यांना 12 कोटी 73 लाख रुपयांची अतिवृष्टी नुकसानभरपाई जमा केली जाणार आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी
मराठवाड्यातील खालील जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सदरील मदत मिळणार आहे.अतिवृष्टी नुसकान भरपाई जिल्ह्यांपैकी परभणी आणि धाराशिव जिल्ह्याने स्वतःचे सॉफ्टवेअर विकसित करून या मदतीचे वाटप केले आहे.
- परभणी ७६ कोटी
- हिंगोली १६ कोटी
- नांदेड २५ कोटी
- बीड ४१० कोटी
- छत्रपती संभाजी नगर २६८ कोटी
- जालना ३९७ कोटी
अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत अनुदान यादी येथे क्लिक करून पहा