महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सन 2022 च्या दिवाळी सणानिमित्त मिळालेल्या योजनेप्रमाणे मोफत धान्य मिळणार आहे.
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सन 2022 च्या दिवाळी सणानिमित्त प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, साखर व 1 लिटर या परिमाणात पामतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला 1 संच (आनंदाचा शिधा) 100 /- प्रतिसंच या दराने वितरीत करण्यात आला होता.
मोफत शिधा वाटप योजना 2023
आता शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, इत्यादी सणानिमित्त प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर या परिमाणात पामतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला “आनंदाचा शिधा” गुढीपाडवा या मराठी नविन वर्षापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीकरिता ई-पॉस प्रणालीद्वारे र 100/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यास मा.मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
आनंदाचा शिधा योजना महाराष्ट्र 2023
गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,इत्यादी सणानिमित्त प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा,चणाडाळ, साखर व 1 लिटर या परिमाणात पामतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला”आनंदाचा शिधा गुढीपाडवा या मराठी नविन वर्षापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीकरिता ई-पॉस प्रणालीद्वारे र 100 /- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे.
आनंदाचा शिधा योजना महाराष्ट्र शासन निर्णय येथे पहा
आनंदाचा शिधा करिता आवश्यक शिधाजिन्नसांची खरेदी करण्याकरीता mahatenders.gov.in या ऑनलाईन पोर्टलद्वारे निविदा सादर करण्याचा कालावधी निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांऐवजी 15 दिवसांचा करुन निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मोफत शिधा योजना लाभार्थी येथे पहा