Employees Reservation : राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता दिव्यांग कर्मचाऱ्यांना टक्के आरक्षण लागू असेल.
Government employees reservation
राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण लागू करण्याचा त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. केंद्र शासनाच्या १७ मे २०२२च्या आदेशाप्रमाणे राज्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट – ड ते गट – अ च्या निम्नस्तरापर्यंत पदोन्नती आरक्षण लागू करण्यात येईल.
दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड मधून गट ड मधील, गट ड मधून गट क मधील, गट क मधून गट क मधील, गट क मधून गट ब मधील, गट ब मधून गट ब मधील तसेच गट ब मधून गट अ मधील निन्मस्तरापर्यंत चार टक्के आरक्षण देण्यात येईल. रिक्त पद असल्यास चार टक्के पदे दिव्यांगांसाठी आरक्षित ठेवण्यात येतील.
state government employees news
अपंगत्वाच्या वेगवेगळ्या प्रकारनिहाय एकूण आरक्षण चार टक्के राहील.ज्या संवर्गात सरळ सेवेने नियुक्तीचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा नसेल अशाच संवर्गात दिव्यांगांना पदोन्नतीत आरक्षण राहील. या संदर्भातीस अन्य सर्व शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहेत.
साधारणपणे 40 टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना शासकीय नोकरी मध्ये शासन निर्णय दि. 29. 05. 2019 अन्वये दिव्यांग अधिनियम-2016 च्या कलम 34 अनुसार शासन सेवेतील पदांवर शारिरीकदृष्ट्या दिव्यांग व्क्तींसाठी 4% आरक्षण विहीत केले आहे.
पदोन्नती आरक्षण धोरण लागू
सदर आरक्षण अमंलबजावणीची कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे. त्यात गट-क व गट-ड च्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना 4 % आरक्षणप्रमाणे पदोन्नती देतांना शासन निर्णय दि. 05.03.2002 प्रमाणे कार्यवाही करण्यात येते.शासननिर्णय दि. 05 जुलै 2021 नुसार पदोन्नतीमध्ये गट-अ व गट-ब साठी दिव्यांग आरक्षण देण्यात येणार आहे.
दिव्यांग पदोन्नती शासन निर्णय येथे डाऊनलोड करा
1 thought on “Employees reservation : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! केंद्राप्रमाणे मिळणार संधी”