Maharashtra Board Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra Board Exam 2024
सदरील निर्णयामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका नीट समजून घेण्यासाठी आणि उत्तरे लिहिण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना तणाव कमी होण्यास मदत होईल आणि ते परीक्षेत चांगले गुण मिळवू शकतील.
विद्यार्थी आणि पालक दोघेही विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ मिळाल्याचा आनंद आहे. तर पालकांना त्यांच्या मुलांना तणावापासून वाचवन्यास मदत होणार आहे.
- जर एखाद्या पेपरसाठी 3 तासांचा वेळ देण्यात येत असेल तर यंदा हा वेळ 3 तास 10 मिनिटांचा असणार आहे.
- एखाद्या पेपरसाठी 2 तासांचा वेळ देण्यात येत असेल तर यंदा हा वेळ 2 तास 10 मिनिटांचा असणार आहे.
- पेपरसाठी 1 तास 30 मिनिटांचा वेळ देण्यात येत असेल तर यंदा हा वेळ 1 तास 40 मिनिटांचा असणार आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा 2024
- इयत्ता बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या दरम्यान होणार आहे.
- दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या काळात घेतली जाणार आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा कधी होणार ?
इयत्ता दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 ते गुरुवार, दिनांक 29 फेब्रुवारी 2024 या काळात घेतली जाणार आहे.
इयत्ता बारावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी ते मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.
दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 ते गुरुवार, दिनांक 29 फेब्रुवारी 2024
इयत्ता बारावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी ते मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.