Old pension strike : जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील 7 दिवसांपासून संप पुकारला होता. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या संपावर तोडगा निघाला आहे. सरकारी कर्मचारी संघटनेनं आपला संप मागे घेतला आहे.
जुनी पेन्शन योजना आंदोलन मागे
आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत असं समन्वय समितीकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले असल्याचे समन्वय समितीकडून सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांना लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे गेले सात दिवस सुरू असणारा संप मागे मागे घेण्यात आला आहे,असे माननीय विश्वास काटकर यांनी जाहीर केले.
Old pension strike updates
शासनाने नेमलेली समिती यावर विचार करणार असून जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यासाठी समितीला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी केले आहे.त्यामुळे उद्यापासून सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचे आवाहन माननीय विश्वास काटकर यांनी केले आहे.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
सात दिवस चाललेल्या संपाचा कालावधी हा अर्जित रजेत वर्ग केला जाणारा असून तो कालावधी नियमित केला जाणार आहे. तसेच संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या नोटिसा मागे घेण्यात येणार असल्याचे सांगितले.(संदर्भ:-News लोकमत18)
मुख्यमंत्री व समन्वय समिती बैठकीतील इतिवृत्त परिपत्रक येथे पहा