OPS Strike updates : राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना या प्रमुख मागणीकरिता आज, सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जात आहेत. संपाच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
14 मार्च संप मिटिंग अपडेट
जुनी पेन्शनसाठी 14 मार्च पासून बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मा. मुख्य सचिव श्री.मनुकुमार श्रीवास्तव साहेब यांचे निमंत्रणानुसार समन्वय समितीच्या सुकाणू समिती सोबत सध्या मंत्रालयात चर्चा आता सुरू झाली आहे.परंतु सदर बैठकीतील पहिली फेरी निष्फळ ठरली आहे.
समन्वय समितीच्या सुकाणू समिती सोबत सोमवारी दि.13 मार्च रोजी दुपारी 12.45 ला चर्चा सुरू झाली.चर्चेच्या वेळी मा. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा. विरोधी पक्षनेते (विधानसभा) ना. अजितदादा पवार साहेब, मा. विरोधी पक्षनेते (विधानसभा) ना. अंबादासजी दानवे साहेब यांचेसह मा. मुख्य सचिव व वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते.
सव्वा तासाच्या चर्चेत ठोस निर्णय नाही
सध्या चर्चेची फेरी संपली.परंतु कोणत्याही निर्णय नाही. शासनाची भूमिका परंतु जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सुस्पष्ट घोषणा करण्याची नाही.कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन संदर्भात समिती गठीत करुन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे दिसून येते आहे.
Old pension scheme Maharashtra
सुकाणू समिती चे प्रमुख व समन्वय समिती चे निमंत्रक मा. विश्वासजी काटकर,अध्यक्ष मा.अशोक दगडे,जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मा. उमेशचंद्र चिलबुले, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष मा.वितेश खांडेकर यांचेसह,प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अध्यक्ष संतोष राजगुरू सर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्याध्यक्ष विजय कोंबे सर उपस्थित आहेत.
आंदोलन संदर्भात सरकारची दडपशाही, शासन परिपत्रक येथे डाऊनलोड करा