लाभार्थी शेतकरी 11व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या वतीने ई-केवायसीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा लांबत चालली आहे. सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 मे निश्चित केली आहे.
PM Kisan Nidhi 2022
पी.एम.किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी 11 व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या वतीने e-kyc साठी विलंब होत असल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा लांबत चालली आहे. सरकारने e-kyc सी करण्याची अंतिम तारीख 31 मे निश्चित केली आहे.जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल,तर ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा.
पीएम किसानच्या 11 व्या हप्त्यावरील ताज्या माहितीनुसार, लवकरच तुमच्या खात्यात 2000 रुपये येणार आहेत.11 वा हप्ता 31 मे रोजी खात्यात वर्ग होईल,अशी अपेक्षा सूत्रांनी व्यक्त केली आहे. हस्तांतरणाच्या विनंतीवर (RFT) राज्य सरकारांनी स्वाक्षरी केली आहे.यानंतर फंड ट्रान्सफर ऑर्डर (FTO) जनरेट होईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.
पीएम किसान 80 % पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे kyc पुर्ण
1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान 11 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायचे आहेत. यासाठी 80 टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी ई-केवायसीचे काम पूर्ण केले आहे. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत 11 वा हप्ता 31 मे पर्यंत हस्तांतरित करता येईल,असा दावा केला जात आहे.
दर चार महिन्यांनी मिळतात 2000 रुपये
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोदी सरकारकडून दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये वर्षातून तीनदा दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हप्ता उशिरा येणार आहे.2021 मध्ये, हा एप्रिल-जुलैचा हप्ता 15 मे रोजी आला.यावेळी ते 31 मे पर्यंत येणे अपेक्षित आहे.पंतप्रधान किसान योजने अंतर्गत देशभरातील 12.5 कोटींहून अधिक शेतकरी नोंदणीकृत आहेत. ई-केवायसी पूर्ण होणार नाही,अशा शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार नाहीत.
तुम्ही अजून PM किसान e-KYC अपडेट केले नसेल तर आजच अर्ज करा.अन्यथा, तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पुढील 10 वा हप्ता मिळणार नाही. केंद्र सरकारने नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य केले आहे. आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी फार्मर्स कॉर्नरमधील पर्यायावर जाऊन किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधू शकता.यासोबतच,तुम्ही अधिकृत वेबसाइटवरून ऑफलाइन अर्जासाठी पीएम किसान केसीसी फॉर्म PDF डाउनलोड करू शकता.
1)सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या pmkisan.gov.in याज्ञअधिकृत वेबसाइट वर जा.
2) समोरच्या पृष्ठावर तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
3) आता Search बटणावर क्लिक करा.
4) यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकण्यास सांगितले जाईल.
5) तुमचा मोबाईल नंबर टाका जो तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे.
6) आता Get OTP बटणावर क्लिक करा.
7) दिलेल्या बॉक्समध्ये मिळालेला OTP टाका.शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा.
अशा प्रकारे तुमचे ई- केवायसी पुर्ण होईल.