School exam results : राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट व अवकळी सुरू आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याची तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित दिले होते.
School holiday 2023
राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २१.०४.२०२३ पासून सुटी जाहीर करण्यात येत आहे.राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घेतला होता.
शालेय विद्यार्थी परिक्षा निकाल 2023
शासन परिपत्रकमध्ये सुट्टीचा कालावधी,शाळाचे निकाल जाहीर करणे,सन २०२३ २४ चे आगामी शैक्षणिक वर्ष सुरू करणे इत्यादीबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
शाळांच्या उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन २०२३ – २४ सुरू करण्याच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन असून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता दिनांक ६ मे २०२३ रोजी आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या निकालासोबत उपक्रम / कार्यक्रमांचे आयोजन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र दिन व छ.शाहू महाराज पुण्यतिथी
महाराष्ट्र दिन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या
स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.दिनांक १ मे २०२३ रोजी ‘महाराष्ट्र दिन’ सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात यावा. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दिनांक ६ मे, २०२३ रोजी शाळांचा शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चा निकाल जाहीर करावा आणि विद्यार्थी/ पालकांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात यावे.
शालेय विद्यार्थी निकाल नवीन शासन निर्णय येथे पहा