State employees : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग, मुंबई या कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन या बाबीकरीता माहे मार्च, २०२३ चे वेतन व महागाई भत्ता फरक करीता अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
महागाई भत्ता व वे’तन अनुदान उपलब्ध
सन २०२३ २४ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीत केलेल्या निधी मधून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग,मुंबई या कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये मार्च २०२३ चे वेतन या बाबीकरीता माहे मार्च २०२३ चे वेतन अतिकालीक भत्ता व महागाई भत्ता करीता अनुदान वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
सद्यस्थितीत वित्त विभागाने उपलब्ध करून दिलेल्या रू.९,२०,९००/- (अक्षरी रुपये नऊ लक्ष बिस हजार नऊशे फक्त) इतका निधी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वेतनावरील खर्चाकरीता अनिवार्य (३६) सहायक अनुदान (वेतन), सन २०२३ २४ या आर्थिक वर्षात माहे मार्च, २०२३ चे वेतन,महागाई भत्ता फरक मार्च २०२३ व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन, शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
Maharashtra state employees news
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने खर्च झालेल्या अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्राची प्रत शासनास सादर केली आहे.सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये मार्च २०२३ चे वेतन महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता एकूण रू.१.२०.९००/- (अक्षरी रुपये नऊ लक्ष विस हजार नऊशे फक्त) इतके अनुदान ३६ सहाय अनुदाने (वेतन) या उद्दिष्टाखाली खालील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे सचिव, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्या आयोग, मुंबई यांच्याकडे वित्त विभागाच्या अटी व शर्तीनुसार तपशीलवार माहिती सादर करण्याच्या अटीस अधीन राहून सुपूर्द करण्यात आले आहे.
42% महागाई भत्ता वाढ तारिख ठरली! पहा किती वाढणार पगार