जूनी पेन्शन योजना संदर्भात अत्यंत मोठी माहिती समोर आली असून महाराष्ट्र सरकारकडून काही कर्मचाऱ्यांना गुपचूप जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी हालचाली सुरू असून लवकरच शासन निर्णय सुध्दा निर्गमित करण्यात येण्याची शक्यता आहे.
पोलीस बिनतारी संदेश विभागातील पोलीस अंमलदार व 1129 अधिकारी व इतर विभागातील 4 अधिकारी / कर्मचारी यांनी “जुनी पेंन्शन योजना” लागू करणेबाबत मा.महाराष्ट्र “प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे मूळ अर्ज क्र. ७३९/२०२१, ७४०/२०२१ व ७४१/२०२१ असे दाखल केले होते.
जुनी पेन्शन संदर्भात दाखल मुळ अर्जावर मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठ औरंगाबाद यांनी एकत्रितरित्या सुनावणी घेतली आहे. मा. न्यायाधिकरणाने अर्जदार यांचे बाजूने दि. 23/12/2022 रोजी आदेश दिले आहेत.
जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र
अपर पोलीस महासंचालक व संचालक,पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी पोलीस अंमलदार अधिकारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२ आणि महाराष्ट्र नागरी सेवा (अंशराशिकरण) नियम १९८४ आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी या तरतुदी लागू करण्यात सुचना मा. न्यायालयाने दिलेल्या आहेत.
शासन स्तरावरुन निणर्य होणेकरिता सदरचा प्रस्ताव उपरोक्त संदर्भान्वये या कार्यालयाच्या मार्फतीने शासनास सादर करण्यास पाठविले आहे.अप्पर महा संचालक यांनी सदरील प्रकरणात संबंधित याचिकाकर्ता अधिकारी यांच्या उक्त नमुद मा.न्यायाधिकरणाच्या आदेशाविरुध्द याचिक दाखल करणे योग्य होणार नाही,असे अभिमत दिले आहे.
अप्पर महा संचालक यांच्या कडून शासनास विनंती करण्यात आली आहे की,मा.न्यायाधिकरणाच्या आदेशाचे पालन करावे अगर कसे याबाबत योग्य ते आदेश अपर पोलीस महासंचालक व संचालक, दळणवळण यांना त्वरेन देण्यात यावा.
जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात परिपत्रक येथे पहा
2 thoughts on “Old pension : बापरे .. आता पुन्हा एकदा ‘या’ कर्मचाऱ्यांना गुपचूप जुनी पेन्शन लागू करण्यासाठी हालचाली सुरू! परिपत्रक आले समोर”