EPS Pension : भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत जास्त पेन्शन मिळण्याची तारीख वाढवली!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

EPS Pension : भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत जास्त पेन्शन मिळण्याची तारीख वाढवली असून ज्यांना वाढीव पेन्शन हवी असल्यास त्यांनी 3 मार्च 2023 पर्यंतचा पर्याय निवडावा अशी सूचना पीएफ विभागाने दिली होती.

EPS Pension news

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेना (ईपीएफओ) त्यांच्या खातेधारकांसाठी वाढीव निवृत्ती पेन्शन मिळवण्याची संधी देत आहे.आता ही मुदत वाढवण्यात आली आहे.

एक सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.तर 1 सप्टेंबर 2014 पासून तुम्ही EPF चे सदस्य असाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे.

EPS pension calculator

EPS च्या मध्ये जमा केलेल्या निधीतून ही पेन्शन दिली जाते.तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुमच्या जोडीदाराला पेन्शनची 50 % रक्कम मिळते.तुमचा आणि जोडीदाराचा दुर्देवी मृत्यू झाल्यास तुमच्या मुलांची 25 वर्षे पूर्ण होईपर्यंत विधवा पेन्शन म्हणून देय रक्कमेच्या 25 % रक्कम मिळते.

मासिक पेन्शन कशी मोजली जाते?
मासिक पेन्शन = (पेन्शनपात्र वेतन x EPS खात्यातील योगदान वर्ष) / 70

हे पण पहा ~  EPF Pension : कर्मचारी व पेन्शन धारकांना मिळेल अधिक पेन्शन! फक्त 'या' तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील...

उदाहरण पहायचे झाल्यास एखाद्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार सरासरी 14 हजार असेल आणि नोकरीचा कालावधी 20 वर्ष असेल तर दरमहा 4 हजार रुपये पेन्शन मिळू शकते.

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पेन्शनकरिता पात्र असलेला पगार 10 हजार रुपये इतका असेल आणि त्याने जर 18 वर्षे नोकरी केली असेल तर (10,000 × 18) 70 = 2570 रुपये इतके पेन्शन त्या कर्मचाऱ्याला मिळेल.

पेन्शन वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी काय करावे?

कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढीसाठी पर्याय अर्ज (ऑप्शन फार्म) कंपनीकडे भरून द्यावे लागणार आहे. परंतु कर्मचाऱ्याने अर्ज भरून न दिल्यास त्याला सध्या जे लागू आहे त्यानुसारच म्हणजे अत्यल्प (५०० ते २२००) इतकी पेन्शन मिळेल.

Eps योजना पर्याय स्वरूपातील असल्याने मागणी केल्यावरच ती लागू होणार आहे.निवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज टपालाने (रजिस्ट्री करून) कंपनीच्या मुख्यालयाकडे पाठवायचे आहे व त्याची एक प्रत ईपीएफ कार्यालायला देखील माहितीसाठी टपालाने पाठवायची आहे.

सरकारने या कर्मचाऱ्यांना गुपचूप लागू केली जुनी पेन्शन

जुनी पेन्शन योजना

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment