RCB vs MI live : आज IPL 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्समध्ये पहिला सामना; मोबाईल वर लाईव्ह ‘येथे’ पाहता येणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RCB vs MI Live : धमाकेदार अंदाजात सुरू झालेल्या आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पाचवा सामना विराट कोहलीच्या  रॉयल चॅलेंजर्स बंगलोर  आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्समध्ये  खेळवला जाणार आहे.

 streaming

मुंबईकरांसाठी आज आयपीएलमधील पहिलाच सामना असल्याने ते उत्सुक आहेत.बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल.दोन्ही संघासाठी हा पहिला सामना असल्याने विजय नोंदवून अंकतालिकेत अंकाचा श्रीगणेशा करण्यासाठी विराट-रोहित तयार आहेत.

मुंबईचा पहिला सामना देवाला!

पण मुंबईचा संघ पहिला सामना जिंकणार का? आरसीबी मुंबईवर भारी पडणार? याबाबतच्या चर्चेला उधाण आलेय. त्याला कारणही तसेच आहे.मागील 10 वर्षांत मुंबईला पहिला सामना एकदाही जिंकता आलेला नाही.मुंबईचे चाहते पहिला सामना देवाला! असे म्हणत आरसीबीच्या चाहत्यांना हिनवत आहेत.

MI vs RCB match weather

सामन्यापूर्वी बेंगळुरुमधील हवामानाची माहिती समोर आली आहे. हवामान खात्यानुसार, आज बंगळुरूचे तापमान 20 ते 33 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या सामन्यावेळी पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

मुंबईकरांना या दोन संघांमधील धमाकेदार सामना पाहता येणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 30 सामने झाले आहेत. ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 13 आणि मुंबईने 17 सामने जिंकले. 

हे पण पहा ~  7th pay commission : खुशखबर... आता या राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झाली वाढ! शासन परिपत्रक आले

मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर लाईव्ह स्कोअर येथे पहा

IPL 2023 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ

डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली,ग्लेन मॅक्सवेल,मोहम्मद सिराज,हर्षल पटेल,वानिंदू हसरंगा,दिनेश कार्तिक,जोश हेझलवुड,शाहबाज अहमद,अनुज रावत,आकाश दीप,महिपाल लोमरोर,फिन ऍलन,शेरफेन रदरफोर्ड,जेसन बेहरेनडॉर्फ,सुयश प्रभुदेसाई,अनिश्‍वर गौतम,कर्ण शर्मा,डेव्हिड विली,रजत पाटीदार,सिद्धार्थ कौल,छमा मिलिंद.

IPL 2023 मुंबई इंडियन्स संघ

रोहित शर्मा (C), डेवाल्ड ब्रेविस, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन , ट्रिस्टन स्टब्स, टीम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, शम्स मुलानी,पियुष चावला, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, जोफ्रा आर्चर, अर्शद खान, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, आकाश मधवाल, दुआन जॅनसेन, विष्णू विनोद, नेहल वढेरा,राघव

मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर लाईव्ह आयपीएलचे सामना येथे पहा 

IPL 2023 Live

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment