Public Holidays : महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टया 2023 केल्या जाहीर! कर्मचाऱ्यांना 25 सुट्ट्या,पहा यादी

PPublic holidays : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन 2023 सालासाठीच्या  सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.2023 मध्ये एकूण 25 सार्वजनिक सुट्ट्या,8 वेळा शनिवार किंवा रविवार असणार आहे.सुट्टयांची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. 

Public holidays 2023

 भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८ – जेयूडीएल / तोन,दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले होते,त्या अधिकाराच्या वापर करून,महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन 2023 सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्ट्या (Public holidays of 2023)म्हणून जाहीर केल्या आहेत.

 • प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी (गुरुवार) 
 • महाशिवरात्री १८ फेब्रुवारी (शनिवार) 
 • छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी (रविवार) 
 • होळी (दुसरा दिवस) ७ मार्च (मंगळवार) 
 • गुढीपाडवा २२ मार्च (बुधवार) 
 • रामनवमी ३० मार्च (गुरुवार) 
 • महावीर जयंती ४ एप्रिल (मंगळवार) 
 • गुड फ्रायडे ७ एप्रिल (शुक्रवार) 
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल (शुक्रवार) 
 • महाराष्ट्र दिन १ मे (सोमवार) 
 • बुद्ध पौर्णिमा ५ मे (शुक्रवार) 
 • बकरी ईद (ईद उल झुआ)२८ जून (बुधवार)  
 • Public holidays of 2023 Maharashtra
 • मोहरम २९ जुलै (शनिवार) 
 • स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट (मंगळवार) 
 • पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १६ ऑगस्ट (बुधवार) 
 • गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर (मंगळवार) 
 • ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबर (गुरुवार) 
 • महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर (सोमवार) 
 • दसरा २४ ऑक्टोबर (मंगळवार) 
 • दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १२ नोव्हेंबर (रविवार) 
 • दिवाळी (बलिप्रतिपदा) १४ नोव्हेंबर (मंगळवार) 
 • गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर (सोमवार) 
 • ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हे पण पहा ~  Solar Generator : आता वीजबिलाचे टेन्शन विसरा ! घरात बसवा स्वस्त सोलर जनरेटर आणि चालवा TV, फॅन आणि फ्रिज

Maharashtra Public holidays 2023

 सरकारी बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी 1 एप्रिल 2023 शनिवारी सुट्टी असून ती केवळ बँकांपुरती मर्यादित आहे.ही सुट्टी शासकीय कार्यालयांना लागू होणार नाहीत.तसेच एकूण 2 सार्वजनिक सुट्ट्या शनिवारी आणि 6 सुट्ट्या ह्या रविवारी आल्या आहेत.

राज्य शासनाने आता भाऊबीज,बुधवार दि.१५ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शासकीय कार्यालये,राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका,नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी अतिरिक्त सुट्टी जाहीर केली आहे.

सार्वजनिक सुट्ट्या 2023 यादी येथे क्लिक करुन पहा

Public holiday

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

%d