DA Arrears : सरकारकडून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार आहे.सुमारे 1 कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी रक्कम सरकारकडे बाकी आहे.याबाबत एक नवीन अपडेट्स समोर आले आहे.
Central employees da arrears
सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात 18 महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकीचे पैसे ट्रान्सफर करणार आहे.सरकारने लोकसभेत 18 महिन्यांची डीए थकबाकीही कळवली आहे. सरकारने सांगितले होते की,कोरोना महामारीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या महागाई भत्त्यातून सरकारला 34,402.32 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.48 लाख कर्मचारी आणि 68 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना लवकरच डीए वाढीची थकबाकी मिळू शकते.
18 Months DA Arrears updates
आत्तापर्यंत सरकारने महागाई भत्त्याच्या थकबाकीवर सहमती दर्शवली नव्हती,परंतु 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे.महागाई भत्ता वाढीच्या तीन हप्त्यांवर सरकारने बंदी घातली होती.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
जून 2021 मध्ये महिन्यात पुन्हा महागाई भत्ता वाढ पुर्ववत करण्यात आली पण 18 महिन्याचा महागाई भत्ता मात्र सरकारने अजून पर्यंत दिला नाही.सहाजिकच केंद्रीने महागाई भत्ता फरक दिल्यास राज्य सुध्दा लवकरच विचार करणार आहे.
7th pay commission DA
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासुन 38 % दराने महागाई भत्ता लागु आहे.4 % DA वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांना एकुण महागाई भत्ता हा 42 % होणार आहे.सदरचा महागाई भत्ता वाढ राज्यातील निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना देखील त्वरित लागु करण्यात येणार आहे.यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारी डी.ए वाढीची मागणी अखेर पुर्ण होणार आहे.
खुशखबर. ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसाचा आठवडा