7th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, पुढचा आठवा वेतन आयोग येवो वा न येवो,पण पगारवाढीसाठी नवा फॉर्म्युला तयार केला जात असून फिटमेंट फॅक्टरने पगार वाढवण्याऐवजी आता नव्या फॉर्म्युल्यानुसार मूळपगार वाढवण्याचा विचार केला जातो आहे.
पीएफ आणि ग्रॅच्युइटीमध्येही वाढ होणार
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या प्रवास भाडे भत्ता आणि शहर भत्ता तसेच महागाई भत्ता वाढ होणार आहे.डीए वाढल्यामुळे भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीमध्येही वाढ होईल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही निवृत्तीचा लाभ मिळणे अपेक्षित आहे.महागाई भत्त्यात वाढ झाल्याने त्यांचे वेतन,भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीमध्येही वाढ होणार आहे. खरे पाहिले तर पीएफ आणि ग्रॅच्युईटीची गणना मुळ वेतन + महागाई भत्त्याच्या आधारे केली जाते.
महागाई भत्ता होणार 45% किंवा 46%
मीडिया रिपोर्ट्सनुसार,जर CPI-IW इंडेक्स नंबर 132.7 च्या वर गेला तर जुलैमध्ये dearness allowance hike 4% आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 42% DA मिळत आहे.जर महागाई भत्ता 3% ने वाढला तर एकूण महागाई भत्ता 45 % होईल. जर CPI-IW 4 टक्क्यांनी वाढल्यास महागाई भत्ता 46 % होईल.
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 वरून 46 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.महागाई भत्त्यात वाढ झाल्याने प्रवास भत्त्यावरही परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना फायदा होईल.
Govt Employees DA Hike
महागाई भत्ता वाढल्यावर हे भत्ते वाढणार आहेत.या बदलामुळे केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच नाही तर पेन्शनधारकांनाही मजा येणार आहे.यामुळे त्यांच्या महागाई निवारणात (डीआर) बदल होणार आहे.दरवर्षी मूळ वेतनात वाढ करण्याची योजना आहे.नवीन फॉर्म्युला 2024 नंतर लागू होण्याची शक्यता आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती होईल वाढ येथे पहा