7th Pay DA Hike : खुशखबर… कर्मचाऱ्यांच्या DA-DR मध्ये 4 % वाढ! 3 महिन्यांची थकबाकीसह मे महिन्यात खात्यात येणार इतके पैसे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th pay DA hike : केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढ केल्यानंतर लगेच राज्य सरकारनेही सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (dearness allowance) 4 टक्क्यांनी वाढ केली आहे.आता महागाई भत्ता 38 % वरून 42% झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.

7th pay commission DA hike

आसाम मंत्रिमंडळाने शुक्रवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 38 % वरून 42 % वाढ करण्यास मंजुरी दिली.आरोग्य मंत्री केशब महंत यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्यातील अखिल भारतीय सेवा (AIS) अधिकारी, निवृत्तीवेतनधारक, राज्य सरकारी कर्मचारी,कुटुंब निवृत्तीवेतनधारक आणि असाधारण निवृत्तीवेतनधारक यांचा महागाई भत्ता/सवलत 1 जानेवारीपासून 4 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.

गोव्यात 4% महागाई भत्ता वाढला

गोवा राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्यात आली आहे.आता कर्मचाऱ्यांचा DA 42 % झाला आहे. एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांना ही DA वाढ मिळणार आहे.

राजस्थान सरकारनेही महागाई भत्त्या 4 टक्के वाढवला

केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजस्थान सरकारने त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी महागाई भत्ता वाढीचे शासन आदेश वित्त विभागाने जारी केले आहेत.

हे पण पहा ~  Dearness Allowance : 18 महिन्याच्या थकित महागाई भत्त्याचा मार्ग मोकळा! पहा किती आणि केव्हा मिळणार फरक

राज्यातील सुमारे आठ लाख कर्मचारी आणि चार लाख निवृत्ती वेतनधारकांना वाढीव डीएचा लाभ मिळणार आहे.वाढीव महागाई भत्ता 1 जानेवारी 2023 पासून मिळणार आहे. 

झारखंड व उत्तर प्रदेश सरकार डीए वाढवण्याच्या तयारीत

झारखंड राज्य सरकारकडून देखील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या कर्मचाऱ्यांचा DA 38% आहे. Now कर्मचाऱ्यांच्या DA 4 % वाढ करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारकडून कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढीचा लाभ दिला जाणार आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 % वाढ करू शकते.आता त्यांचा महागाई भत्ता 38% वरून 42% होईल.यासोबतच 3 महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केव्हा वाढणार येथे पहा

Dearness allowance

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

1 thought on “7th Pay DA Hike : खुशखबर… कर्मचाऱ्यांच्या DA-DR मध्ये 4 % वाढ! 3 महिन्यांची थकबाकीसह मे महिन्यात खात्यात येणार इतके पैसे”

Leave a Comment