Gov Employees DA hike : सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून 4 % दराने दिली जाणार असून डिसेंबर 2022 महिन्याचे निर्देशांकाची आकडेवारी समोर आली असून एवढा दिला जाणार आहे.
Government Employee’s news
भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकात जुलै महिन्यापासून सातत्याने वाढ होत आहे.ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरच्या आकडेवारीत कोणताही बदल झालेला नाही,ऑगस्टमध्ये हा आकडा 130.2 अंकांवर होता.सप्टेंबरमध्ये तो 131.3 अंकांवर होता.ऑक्टोबरमध्येही निर्देशांकाचा आकडा 132.5 होता..
Dearness allowance hike
AICPI मध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे 65 लक्ष कर्मचार्यांसाठी अंतर्गत मार्ग मोकळा झाला आहे.आता डिसेंबर महिन्याचे निर्देशांक 31 जानेवारी 2023 रोजी समोर आले आहेत.यानुसार आता महागाई भत्त्यात 4.23 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे.परंतु महागाई भत्त्यात वाढ देताना दशांश स्थानी असलेली किंमत गृहीत धरली जात नाही.
सध्या स्थितीला कर्मचाऱ्यांना 38 % दराने महागाई भत्ता मिळत असून जानेवारी महिन्यापासून 42 % दराने महागाई भत्ता हा मिळणार आहे. याबाबत ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
महागाई भत्ता कॅल्क्युलेटर येथे पहा
शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाकडून तयार केला जाणार आहे.
Dearness Allowance Arrears
सदरचा वाढीव महागाई भत्ता माहे जानेवारी 2023 पासून प्रत्यक्ष रोखीने फरकासह लागू करण्यात येईल.दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो.यामुळे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच महागाई भत्ता वाढीचा लाभ हा मिळणार आहे.
1 thought on “Gov Employees DA hike : खुशखबर…कर्मचाऱ्यांच्या पगार वाढणार! पगारामध्ये होणार सुमारे 10800 रुपयांची वाढ”