Old pension : राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचारी 14 मार्च पासून जुनी पेन्शन योजना साठी संपावर जाणार आहे.राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून केला जात असल्याने या संपावर शासनाकडून काय तोडगा काढला जातो? जुनी पेन्शन योजने बाबत राज्य सरकार काय निर्णय घेते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र
राजधानी मुंबई येथे 9 फेब्रुवारी रोजी शासकीय,निमशासकीय,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीची बैठक पार पडली होती.तर 12 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ,कोल्हापुर प्रत्येक राज्यव्यापी आंदोलनात सक्रीय सहभाग घेणार आहे.दिनांक 14 मार्च 2023 पासून सुरु होत असलेल्या बेमुदत संपात सर्वांनी सहभागी व्हावे यासंदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ,कोल्हापुर ने परिपत्रक काढले आहे.
Old pension scheme news
सदरील बैठकीत सुध्दा 14 मार्चपासून संपावर जाण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाला नोटीस देखील देण्यात आली आहे.
Juni pension updates
जिल्हा पातळीवर राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत ही नोटीस पुन्हा एकदा शासनाला पाठवली जाणार असल्यामुळे येत्या काही दिवसात मुद्दा पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरणार आहे.
आठव्या वेतन आयोग संदर्भात मोठी अपडेट्स येथे पहा