MCX Cotton market : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी कापसाच्या बाजार भाव संदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहले आहे.कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांचा दर देण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे.
Kapus bajar bhav 2023
राज्यात अद्यापही हवा तसा कापूस शेतकऱ्यांनी बाजारात आणला नाही.याचे कारण म्हणजे कापसाला मिळत असलेला कमी भाव. कापसाच्या गाठीसह आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस दरात Kapus bajar bhav 2023 चढउतार पहायला मिळतो आहे. त्यामुळे कापसाच्या भावातही सातत्याने घसरण होत आहे.
सद्यस्थितीत शासनाने प्रति क्विंटल 6 हजार 380 असा दर निश्चित केला आहे. हा दर खूप कमी असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.दर कमी असल्यामुळे बाजारात विक्रीसाठी कमी कापूस जात आहे.सध्या 7 हजार 500 ते 8 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकला जात आहे.
2023 मध्ये 51 हजार टन कापूस ऑस्ट्रेलियातून विविध टप्प्यात येणार असून यापूर्वी 28 डिसेंबर रोजी 5 लाख क्विंटल कापूस आयात करण्यात आला होता.आता पुन्हा 10 लाख क्विंटल कापूस आयात करण्यात आला आहे.त्यातल्या त्यात कापसाच्या आयातीवर लागू होणारे 11 % शुल्कही माफ करण्यात आले आहे.
सरकारने आयतीवर बंदी घालून आयात शुल्क वाढवायला पाहिजे,जेणेकरून शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळेल.
आजचे ताजे कापूस बाजार भाव येथे पहा
सरकारच्या चुकीचे धोरणांमुळे आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.यावरचा तोडगा काढण्यासाठी सरकारने तातडीने यावर निर्णय घ्यायला पाहिजे असे मत तज्ञ व्यक्त करत आहेत.
अभ्यासकांच्या माहितीनुसार कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.मागील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ झाली होती. यावर्षी देखील मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ होईल अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.