Family pension : कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तीवेतन योजना संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित! शासन निर्णय दि. 26/4/2023

Family pension : दि.01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर अकृषि विद्यापीठे व संलग्नित मान्यता प्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालये/ संचालनालय/अशासकीय अनुदानित संस्था,शासन अनुदानित अभिमत विद्यापीठे यामधील शासन अनुदानित पदावर नियुक्त झालेल्या व DCPS / NPS लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.

Family pension and gratuity

शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून बंद करण्यात येत आहे.सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेण्यात येऊ नयेत,तसेच प्रलंबित प्रकरणे बंद करण्यात यावीत.

सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान आणि रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान लागू करण्यात आले आहे.

कुटुंब निवृत्तीवेतन /रुग्णता निवृत्ती वेतन

सदर कुटुंब निवृत्तिवेतन धारकास व रुग्णता निवृत्तिवेतन धारकास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन /रुग्णता निवृत्ति वेतन लागू होईल.

हे पण पहा ~  Government employees : पेन्शन आणि ग्रॅच्युइटी संदर्भात मोठी बातमी! आता या कर्मचाऱ्यांना नाही मिळणार पेन्शन व ग्रॅच्युइटी

सेवानिवृत्ती व मृत्यू उपदान मिळणार

शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ति उपदान लागू करण्यात येत आहे.वरील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ति उपदान व मृत्यू उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्य:स्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील तरतूदी लागू राहतील.

कुटुंब निवृत्ती वेतन योजना अमंलबजावणी, pdf फॉर्म इ सविस्तर माहिती येथे पहा

कुटुंब निवृत्ती वेतन योजना

Family pension and gratuity Form

दि.०१.११.२००५ ते या निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान, कुटुंब निवृत्तिवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबतचा नमुना- ३ मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा लागेल.

DCPS/NPS मधील जमा रक्कम पण परत मिळणार पहा सविस्तर

DCPS NPS Amount

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment