Old pension : रविवारी हरियाणातील सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यातील भाजप सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे.जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अंदोलन सुरू केले आहे.
जुनी पेन्शन योजना अपडेट्स
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून हटवण्यासाठी हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
जुनी पेन्शन योजना समितीचे प्रवक्ते प्रवीण देशवाल यांनी दावा केला की या आंदोलनात 70,000 कर्मचारी सहभागी झाले आहेत.राजस्थानमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. येथे भाजप शांततापूर्ण आंदोलन सुरूच ठेवू.”
#WATCH | Government employees protest near Haryana CM's residence in Panchkula demanding restoration of Old Pension Scheme; Large police force deployed pic.twitter.com/TrsTNzhNke
— ANI (@ANI) February 19, 2023
Old pension latest news
सरकार कर्मचाऱ्यांशी बोलत नसुन,जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील कर्मचाऱ्यांनी पंचकुला ते चंदीगडपर्यंत मोर्चा काढला.चंदीगडमध्येही कामगारांची पोलिसांशी जोरदार वादावादी झाली आहे.कामगार बॅरिकेड काढून चंदीगडमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पोलिसांची त्यांच्याशी झटापटही झाली.
सरकारी कर्मचाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या तोफांचाही वापर केला.अनेक कर्मचारीही जखमी झाले आहेत. चंदिगड-पंचकुला सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.2006 नंतर नियुक्त झालेले 1.5 लाखांहून अधिक कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेची सतत मागणी करत आहेत.
Juni pension yojana
हरियाणात 20 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून काँग्रेस सभागृहात जुन्या पेन्शन योजनेची मागणी करणार आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनी केली आहे.