State employees DA : महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्राप्रमाने प्रमाणे वाढ लागू करण्यात आली आहे.आता उर्वरित कर्मचाऱ्यांना सुध्दा महागाई भत्त्याचे गिफ्ट मिळणार आहे.
राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढणार!
कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 42 % दराने महागाई भत्ता मिळणार आहे.वाढलेला महागाई भत्ता हा जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार नुकतीच राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल महिन्याचे वेतन त्याचबरोबर पेन्शन सोबत वाढीव 4% टक्के महागाई भत्ता प्रत्यक्ष रोखीने अदा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे.
खुशखबर… सातवा वेतन आयोग थकबाकी फरक मिळणार! शासन निर्णय आला
7th pay commission updates
शिंदे – फडणवीस सरकारकडून लवकरच महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो.अशातच केंद्र सरकार द्वारे मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की यावेळी सरकारकडून नवीन फॉर्म्युला लागू केला जाऊ शकतो.
मीडिया रिपोर्ट मध्ये केलेला दावा जर खरा ठरला तर महागाई भत्ता वाढीचा लाभ पुढील महिन्यापासून राज्यातील सर्वच शासकीय,अनुदानित शाळांमधील कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना मिळणार आहे.
State employees DA hike
डीए वाढ जानेवारी महिन्यापासून अनुज्ञय राहणार असल्याने जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम म्हणजे थकबाकी देखील राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याच्या वेतन देयकासोबत देऊ केली जाईल.
वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,डीए वाढवण्याची तयारी जोरात सुरू आहे, लवकरच राज्य सरकार महागाई भत्त्यात वाढ करू शकते.याचा फायदा 18 लाख सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना होणार आहे.
महागाई भत्ता वाढ 4% पगार वाढ व मिळणारा फरक येथे कॅल्क्युलेट करा
एप्रिल महिन्याचा पगार झाला… आता मे चा मिळेल…