Old pension strike : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप पुकारला होता.जुनी पेन्शन मागणीसाठी राज्यातील तीन प्रमुख संघटना राजपत्रित अधिकारी महासंघ,राज्य मध्यवर्ती संघटना आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांची पहिली बैठक 21 एप्रिल रोजी पार पडली, पण आज सुद्धा काही कर्मचारी जुनी पेन्शन व कुटुंब निवृत्ती वेतन योजनेसाठी आंदोलन करण्यात आहेत.
जुनी पेन्शन योजना अपडेट्स
राज्यात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षक व इतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे 3 मे 2023 पासून हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आहे.या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे.दररोज सुमारे 1000 ते 1500 राज्यातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहत आहेत.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
कुटुंब निवृत्ती वेतन व ग्रॅच्युटी नाही मिळणार लाभ
राज्यात 2005 पूर्वी नियुक्त झालेले राज्यात एकूण 26,800 कर्मचारी असून या बाबत सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायलायत लढा ही सुरू आहे.
सन 2005 नंतर नियुक्त कर्मचारी यांना शासनाने 31 मार्च 2023 रोजी वित्त विभागाने शासन आदेश काढून कुटुंब निवृत्ती वेतन, रुणता उपदान,ग्रॅच्युटी इत्यादी लाभ लागू केली आहे, पण या कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे त्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे.
NPS धारकांना कुटुंब निवृत्तीवेतन व ग्रॅच्युटी किती मिळणार येथे पहा