बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी रुपये ३४,२२,४०,०००/- (रुपये चौत्तीस कोटी बावीस लाख चाळीस हजार फक्त) इतके अनुदान स्थानिक संस्थाना अर्थसहाय्य मुंबई महानगरपालिकेस लेखाशीर्षा अंतर्गत सन २०२२-२३ च्या मंजूर तरतूदीतून अदा करण्यास याद्वारे मंजूरी देण्यात येत आहे.
State employees latest news
बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी शिफारस केल्यानुसार सन २०१८-१९, २०१९-२० २०२० २१ २०२१-२२ व सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील पहिल्या. दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यापोटी वेतन अनुदानाची प्रतिपूर्ती म्हणून एकूण रु. १९१.९८,९५,३७०/- (रूपये एकशे एक्याण्णव कोटी अठ्ठयाण्णव लाख पंच्याण्णव हजार तीनशे सत्तर फक्त) इतकी रक्कम अनुज्ञेय आहे.
प्राथमिक शाळांचे अनुज्ञेय वेतन अनुदानाची प्रतिपूर्ती व प्रत्यक्षात देण्यात आलेल्या रक्कमेतील तफावत असलेल्या थकीत अनुदानाची प्रतिपूर्ती एकूण रक्कम रु.५,६३,२०,३७९/- (रुपये पाच कोटी त्रेसष्ट लाख वीस हजार तीनशे एकोणऐंशी फक्त ) अनुज्ञेय आहे.
महानगर पालिका कर्मचारी अपडेट्स
सन २०१८-१९ ते २०२२-२३ मधील पहिल्या,दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यापोटी अनुज्ञेय वेतन अनुदान व मागील काही वर्षासाठीचे थकीत वेतन अनुदान असे एकूण रु.१९७.६२,१५.७४९/- (रुपये एकशे सत्याण्णव कोटी बासष्ट लाख पंधरा हजार सातशे एकोणपन्नास फक्त) इतकी रक्कम वेतन अनुदानाची प्रतिपूर्ती म्हणून मंजूर करण्याबाबत प्राप्त झालेला प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
खुशखबर महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला, पहा किती वाढणार पगार
बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी शिफारस केल्यानुसार सन २०१८-१९ ते सन २०२२-२३ मधील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यापोटी अनुज्ञेय वेतन अनुदान व मागील काही वर्षांसाठीचे थकीत वेतन अनुदान असे एकूण रु. १९७,६२,१५७४९/- (रुपये एकशे सत्याण्णव कोटी बासष्ट लाख पंधरा हजार सातशे एकोणपन्नास फक्त) इतकी रक्कम अनुज्ञेय आहे.
सरकारी कर्मचारी वेतन संदर्भात शासन निर्णय येथे डाऊनलोड करा