Old age pension : जुना पेन्शन योजने संदर्भात अत्यंत सहकारात्मक आणि आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समोर आलेले असून लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना एक गोड बातमी मिळणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे तर बघूया सविस्तर माहिती काय आहे.
जुनी पेन्शन योजना लागू होणार!
आपल्या सर्वांनाच माहिती होतं की 14 मार्च 2023 पासून राज्यभरातील सुमारे 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्रात एक मोठं आंदोलन उभं केलेलं होतं आणि या आंदोलनामध्ये सरकारच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वतीनेच जुनी पेन्शन योजनेसारखीच एक नवीन योजना लागू करण्यासंदर्भात अभ्यास समिती स्थापन केलेली होती.
आता या समितीच्या अहवाल लवकरच समोर येणार असून या त्रिस्थ सदस्य समितीने आपला अहवालात सकारात्मक बाबींची दखल घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.आज झालेल्या कर्मचाऱ्यांच्या महासंघासोबत सोबत त्रिसदस्यीय समितीने आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शविलेली आहे.
अभ्यास समितीचा अहवाल 31 जुलैपर्यंत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात येणार आहे त्यानंतर लवकरच सदरील अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवून जुन्या पेन्शन प्रमाणे नवीन पेन्शन मधील सर्व बाबींचा समावेश करून कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे.
Old age pension news
महाराष्ट्रातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यां अशा पल्लवीत झालेल्या आहेत मित्रांनो आपल्याला माहितीच असेल की महाराष्ट्रा शिवाय इतर जे काँग्रेसच्या अशीच राज्य आहेत ज्यामध्ये हिमाचल प्रदेश असेल छत्तीसगड असेल राजस्थान असेल यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू झालेली असून आता जुलै महिन्यात कर्नाटक मध्ये सुद्धा जुने पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे त्यामुळे भाजप वरती जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी दबाव टाकण्यास सुरुवात केलेली आहे परिणामी केंद्रात आणि राज्य सुद्धा जुन्या पेन्शनसाठी अभ्यास समिती स्थापन करण्यात आली होती.
राष्ट्रीय पेन्शन योजना लागू धारकांना मिळणार अर्जित रजा रोखीकरण