Ahilyabai holkar purskar : खुशखबर.. प्रत्येक गावातील दोन महिलांना मिळणार अहिल्याबाई होळकर सन्मान पुरस्कार! पहा पुरस्कार रक्कम पात्रता, शासन निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahilyabai holkar purskar : महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत / गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमित्त दिनांक ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

अहिल्याबाई होळकर सन्मान पुरस्कार 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी दिनांक ३१ मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत / गट ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या दोन कर्तबगार महिलांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यास या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यात येत आहे.

सदर पुरस्कार हा दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी देण्यात येईल. सदर पुरस्काराचे स्वरूप,पात्रता निकष, पुरस्कारार्थी महिलेची निवड करण्याची कार्यपध्दती व यंत्रणा खालीलप्रमाणे राहील पुरस्कारार्थी महिलेची निवड कार्यपध्दती इच्छुक महिलेने स्वतःची वैयक्तिक माहिती व केलेल्या कार्याच्या तपशिलासह ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा.

अहिल्याबाई होळकर पुरस्कार स्वरूप

अ) जिल्हास्तरावर जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी यांनी समन्वयाने जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उपरोक्त उपक्रम योग्य पध्दतीने राबविण्याची दक्षता घ्यावी.

हे पण पहा ~  PM Kisan : शेतकऱ्यांनो ई-केवायसीची अंतिम तारीख जाहीर! नाहीतर मिळणार नाही 13 वा हप्ता

बा तालुकास्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी व संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) यांनी समन्वयाने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उपरोक्त उपक्रम योग्य पध्दतीने राबविण्याची दक्षता घ्यावी.

क) ग्रामपंचायत स्तरावर दोन कर्तबगार महिलांची निवड करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, पोलिस पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांची समिती गठीत करण्यात यावी. ज्या ग्राम पंचायतीमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी यांचा कार्यकाल समाप्त झालेला असेल/ ग्रामपंचायत बरखास्त झालेली असेल, अशा ठिकाणी प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात यावी.

३. सन्मानपत्राचा विहीत नमुना आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शासनाच्या मान्यतेने निश्चित करुन जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला उपलब्ध करुन द्यावा. त्यापुढील कार्यवाही ग्रामपंचायत स्तरावर करण्यात यावी.

अहिल्याबाई होळकर पुरस्कार रक्कम व पात्रता निकष येथे पहा

अहिल्याबाई होळकर पुरस्कार

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment