Bakshi samiti : केंद्र शासनाने ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेण्यांत दिनांक १ जानेवारी, २०१६ पासून सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता.
Government employees News
केंद्र शासनाच्या निर्णयांच्या आधारे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचान्यांच्या वेतनश्रेण्यांत सुधारणा करण्याच्या दुष्टीने शिफारशी करण्यासाठी श्री. के. पी बक्षी, सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती 2017 स्थापन करण्यात आली होती.
प्रधान सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव (व्यय) वित्त विभाग हे या समितीचे सदस्य होते. समितीने आपला अहवाल खंड-१ शासनास दि. 5 डिसेंबर 2018 रोजी सादर केला होता.सदर अहवालातील शिफारशी शासन निर्णयान्वये स्वीकृत करण्यात आल्या आहेत.
7th pay commission arrears
राज्य वेतन सुधारणा समितीने अहवाल खंड 2 शासनास दि.8 फेब्रुवारी 2021 रोजी सुधारणेसह सादर केला आहे.सदर अहवालातील शिफारशींवर निर्णय घेण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.याबाबत सदर अहवाल मा.मंत्रीमंडळापुढे सादर करण्यात आला होता. मा.मंत्रीमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आला आहे.
Bakshi samiti ahwal 2
महाराष्ट्र सरकार गृह विभाग,शालेय शिक्षण विभाग,उच्च व तंत्रज्ञान विभाग आणि जिल्हा परिषदेमधील 105 संवर्गातील पदांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबच्या शिफारशीस राज्य शासनाने सहमती दर्शविली होती.
सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
सबंधित संवर्गातील सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात येणार आहे.तसेच ज्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये त्रुट्या आढळूनही त्रुटी दुर झालेली नाही अशा कर्मचाऱ्यांकडून बक्षी समिती सुधारणांसाठी निवेदन सादर करण्यात आलेले घेण्यात आलेले आहेत.
बक्षी समिती अहवाल खंड 2
अहवाल खंड 2 मध्ये केवळ वर्ग ‘अ’ आणि ‘ब’ व S – 8 पेक्षा अधिक वेतन असणाऱ्या वर्ग ‘क’ मधील 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यात आल्या आहे.
खंड 2 मध्ये ज्या पदांच्या वेतनश्रेणीमध्ये खऱ्याच त्रुट्या होत्या.अशा पदांचा विचार बक्षी समिती खंड 2 मध्ये करण्यात आलेला नसल्याने कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे.
बक्षी समिती अहवाल खंड 2 येथे पहा
1 thought on “आनंदाची बातमी ! राज्यातील आणखी ‘या’ संवर्गातील पदांना लागु होणार सुधारित वेतनश्रेणी ! राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय !”