Bank Rule : भारत सरकारने अनधिकृत आणि बेहिशेबी पैशाच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत.सरकारने बॅंकेतून कॅश काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे.आता यापुढे तुम्हाला बँकेतील व्यवहार करण्यासाठी अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे.
Bank Cash Deposits Rules
मोठ्या रक्कमांचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे तुम्हाला ही बंधनकारक असणार असून रोख रक्कम भरण्यासाठी केंद्र सरकारने आता कडक पावले टाकली आहेत.केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्राप्तिकर नियम 2022 अंतर्गत नवे नियम तयार केले.
केंद्र सरकारने 10 मे 2022 या नियमांची अंमलबजावणी करणारी अधिसूचना जारी केली असून रोख रक्कम भरणा केल्यास किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम मिळाल्यास दंडाची तरतूदही करण्यात आली आहे.
New cash transaction updates
नवीन बॅंक नियमांनुसार आता 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करणे किंवा काढण्यासाठी पॅन किंवा आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सदरील नवीन नियम लागू झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली तर मोठा दंड आकारला जाणार आहे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास आता कोणत्याही खाजगी आर्थिक कंपनी,सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील आपल्या एक किंवा अधिक खात्यांमध्ये पॅन आणि आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
KYC नसेल तरी होणार व्यवहार
साधारणपणे बॅंक खातेधारकांकडून ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा घेतला जाते.अशावेळी केवायसी अद्ययावत न केल्यास खात्यातील व्यवहारच बँका रोखत आहेत.
KYC नसेल तरी ग्राहकांचे बँकेचे व्यवहार थांबवू नका अशा वेळी 30 दिवसांत क्लेमची रक्कम द्यावी असे RBI ने स्पष्ट केले आहे. बॅंक ग्राहकांकडे वारंवार kyc मागण्यात येऊ नये आणि फक्त केवायसी नसल्याच्या कारणावरून बँकिंग व्यवहार रोखण्यात येणार नाही अशी शिफारस RBI च्या एका समितीने केली आहे.
आता वारसदारांना अशी मिळणार बँकेत जमा कॅश ? येथे पहा सविस्तर