DA hike : केंद्र सरकारने मागील महिन्यात कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची जानेवारी 2023 पासून लागू केली होती.आता पुढील महागाई भत्ता जुलै 2023 पासून जाहीर होणार आहे.
केंद्रीय सरकारी कर्मचारी DA वाढ देखील 4 % वाढ लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात असताना महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अजून वाढलेला नाही, याबद्दल मोठी अपडेट्स समोर आली आहे.
DA Hike new updates
कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट असून राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.सदरील मागणीवर एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन, शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
मीडिया रिपोर्ट्स मध्ये मंत्रालय वित्त विभागाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीसाठीचा प्रस्ताव तयार केला असून लवकरच महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढून मिळणार आहे.
महागाई भत्ता वाढीसह फरकही मिळणार!
महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून अनुज्ञय राहणार असल्याने जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम म्हणजे थकबाकी देखील राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याच्या वेतन देयकासोबत देऊ केली जाईल.
बापरे.. या सरकारी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता बंद!