Dearness Allowance : केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढ केल्यानंतर लगेच ‘या’ सरकारनेही सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली आहे.आता महागाई भत्ता 38 % वरून 42% झाला आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना 4 टक्के डीए वाढ
केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजस्थान सरकारने त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी महागाई भत्ता वाढीचे शासन आदेश वित्त विभागाने जारी केले आहेत.
राज्यातील सुमारे आठ लाख कर्मचारी आणि चार लाख निवृत्ती वेतनधारकांना वाढीव डीएचा लाभ मिळणार आहे.वाढीव महागाई भत्ता 1 जानेवारी 2023 पासून मिळणार आहे.
महागाई भत्ता फरक जीपीएफ खात्यात!
जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचा महागाई भत्ता फरक कर्मचाऱ्यांच्या GPF खात्यात जमा केला जाईल.एप्रिलपासून वाढीव पगारासह रोखीने दिला जाणार आहे.वर्कचार्ज केलेल्या कर्मचाऱ्यांनाही वाढीव डीएचा लाभ मिळेल.
केंद्र सरकारने डीए वाढवताच राज्य सरकारही डीए वाढवत आहे.सरकार कर्मचाऱ्यांशी संबंधित निर्णय तातडीने घेत आहे
राजस्थानमध्ये गेल्या अर्थसंकल्पापासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली. राज्य कर्मचार्यांशी संबंधित विषयांवर सरकार तातडीने निर्णय घेत आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केव्हा वाढणार येथे पहा