Education news : सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. १ ली ते इ.८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
School students uniform news
सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांनादेखील देण्यात येणार आहे. सदर योजनेंतर्गत एका गणवेशाकरीता रु.३००/- याप्रमाणे प्रति विद्यार्थी दोन गणवेशाचा लाभ देण्यात येतो. प्रस्तुत योजनेचा निधी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस शासनामार्फत उपलब्ध करुन दिला जातो. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीमार्फत स्थानिक स्तरावर गणवेश विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले जातात.
स्काऊट व गाईड शिक्षणाची संस्कार क्षमता विचारात घेवून राज्यातील शाळांमध्ये स्काऊट शिक्षणाचा समावेश करण्यात येणार आहे. सदर स्काऊट व गाईड विषयाच्या शिक्षणासाठी वेगळा गणवेश निर्धारित करण्यात आलेला आहे.
विद्यार्थी गणवेश अनुदान 2022
सध्यस्थितीत आवश्यक असणारा वेगळा गणवेश सद्यस्थितीत विद्यार्थ्यांच्याकडे उपलब्ध नाही.त्यामुळे प्रस्तुत शाळांमधील विद्यार्थ्यांना स्काउट व गाईड या विषयास अनुरूप असणारा गणवेश उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
आता या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश पहा सविस्तर
मोफत गणवेश योजनेंतर्गत संपूर्ण राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईड विषयास अनुरूप एक समान एक रंगाचा दर्जेदार गणवेश उपलब्ध करुन देण्याकरीता योजनेच्या अंमलबजावणीमध्ये बदल करण्यात आला आहे.
गणवेश अनुदान अमंलबजावणी व शासन निर्णय येथे डाऊनलोड करा