Employees reservation : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून या निर्णयांमध्ये दिव्यांग आरक्षणासंदर्भात काही सूचना दिलेल्या आहेत तर बघूया संबंधित शासन निर्णय
सरकारी कर्मचारी आरक्षण शासन निर्णय
महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आस्थापनेवरील गट-अ ते गट ड मधील विविध पदांसाठी दिव्यांग आरक्षण सुनिश्चित करण्यात आले आहे. प्रधान सचिव,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगासाठी शासन सेवेत पदे सुनिश्चित करण्यासाठीच्या तज्ञ समिती नेमली होती.
तज्ञ समितीच्या दि. २२ व २३ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्तानुसार, परिवहन विभागाच्या अखत्यारीतील परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या अधिपत्याखालील मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, पहारेकरी व वाहन चालक ही पदे दिव्यांग आरक्षणातून वगळलेली आहेत.
1 जुलै च्या वार्षिक वेतनवाढी नंतर पगार किती होणार? जुलै वार्षिक वेतनवाढ 10 सेकंदात काढा
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३०७०४१८३३४०६०२९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
दिव्यांग आरक्षण शासन निर्णय येथे डाऊनलोड करा – शासन निर्णय