FFamily pension : सरकारी कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन (Family Pension) आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान मिळणार आहे.शासन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याला सेवा उपदान मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय दि.31/3/2023 निर्गमित करण्यात आला होता.यामध्ये शुद्धिपत्रक आले असून महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
Dcps NPS latest news
परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करणेबाबत नवीन शासन निर्णय आज निर्गमित झाला आहे.
निवृत्तीवेतन शासन शुध्दीपत्रक
संदर्भाधीन शासन निर्णयामध्ये जेथे “सेवा उपदान” असा मजकूर नमूद आहे तेथे त्याऐवजी “सेवानिवृत्ती उपदान” असे वाचण्यात यावे असे आजच्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
कुटुंब निवृत्ती वेतन योजना
कुटुंब निवृत्ती वेतन योजना नवीन शासन निर्णय निर्गमित झाला आहे.31 मार्च 2023 शासन निर्णया मधील कुटुंब तपशील नमुना-१ व 1982 सर्व कार्यरत NPS/DCPS धारक कर्मचारी /शिक्षक/अधिकारी यांनी फॅमिली पेंशन व ग्रॅच्युटी विकल्प नमुना-२ असे दोन्ही फॉर्म पूर्ण भरून स्वाक्षरी करून आपापल्या आस्थापना / विभाग प्रमुख कार्यालयात लवकरात लवकर जमा करायचे आहे.
आजचा कुटुंब निवृत्ती वेतन शासन निर्णय व फॉर्म येथे डाऊनलोड करा
1 thought on “NPS सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्ती वेतन संदर्भात आज शासन निर्णय निर्गमित! Family pension”