sbi personal loan पर्सनल लोन घेताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Personal loan : तुमच्या कोणत्याही गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे लोन घेऊ शकता. हे कर्ज ग्राहकाच्या उत्पन्नानुसार दिले जाते.पर्सनल लोन घेणे सध्या खूप सोपे झाले आहे.तुमचा CIBIL स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही अडचणी शिवाय वैयक्तिक कर्ज मिळेल.या शिवाय पर्सनल लोन घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी सदैव लक्षात ठेवा.

Personal Loan (वैयक्तिक कर्ज)

नवीन तंत्रज्ञानाने बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत.या बदलातून बँकिंग आणि वित्त क्षेत्रही मागे राहिले नाही. आजकाल एसएमएस, मेल आणि फोन कॉलवरून देखील वैयक्तिक कर्जाची ऑफर मिळत असते. काहीजण कमी व्याज दराने वैयक्तिक कर्ज (Personal Loan) देण्याची ऑफर देतात.यामुळे बरेच जण या सापळ्यात अडकतात आणि कर्ज घेतात.
वैयक्तिक कर्जाची निवड करण्याआधी,“Personal Loan (वैयक्तिक कर्ज)”ची गरज खरोखरच आहे का? हा विचार करावा.किती आणि कोणत्या कर्जदाराकडून कर्ज घ्यावे? त्याची परतफेड कशी करावी? त्यासंबंधीचे नियम काय आहेत?अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखामधून आपण पाहणार आहोत.

पर्सनल लोन घेताना घ्यावयाची काळजी

 

  • विनाकारण पर्सनल लोन घेतल्यास नंतर त्रास होऊ शकतो. तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज घ्या.
  • पर्सनल लोनचा व्याजावर जास्त असतो,अनेकदा लोक विचार न करता पर्सनल लोन घेतात आणि नंतर कर्जाच्या जाळ्यात अडकतात.
  • गृह कर्ज आणि कार कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज खूपच महाग आहे.जर तुम्हाला पैशाची नितांत गरज असेल तरच हा पर्याय निवडा.
  • सोने तारण किंवा इतर मालमत्ता असेल तर ती तारण ठेवून कर्ज घेता येते,जे वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त असेल.
  • वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी अनेक बँकांमधील व्याजदर तपासून घ्यावे आणि जेथे स्वस्त मिळेल त्या बॅंकेकडून कर्ज घ्या.
  • प्रक्रिया शुल्क आणि प्री-पेमेंटबद्दल जाणून घ्या.जेणेकरून नंतर त्रास होणार नाही.
  • काही बँका वैयक्तिक कर्ज मुदतीपूर्वी बंद (प्री क्लोजर) करण्याचा पर्याय देत नाहीत.मुदतपुर्व लोन बंद करण्यासाठी अधिकचा चार्ज द्यावा लागतो परत GST भरावा लागतो.त्याची चौकशी करून घ्या.
  • पर्सनल लोन घेते वेळेस बॅंक वेगवेगळ्या पॉलिसी ग्राहकांना जबरदस्तीने काढायला सांगतात,त्याची माहिती अगोदरच घ्या,सर्व प्रोसेस पुर्ण झाल्यावर बॅंक अधिकारी आपल्यावर दबाव आणतात.
  • आपला सिबिल स्कोअर चांगला असेल तर व्याजदर कमी लागतो. तेव्हा सिबिल स्कोअर चांगला ठेवा.
  • शक्यतो मोठी गरजअसल्यास एकच मोठे पर्सनल लोन घ्या, अनेक बॅंकेकडून पर्सनल लोन घेऊन कर्जात अडकू नका.
हे पण पहा ~  google pay loan काही मिनिटात गुगल पे वरून घ्या 1 लाख रुपये कर्ज! पहा संपूर्ण माहिती

 

पर्सनल लोन साठी लागणारी कागदपत्रे (Documents  for personal loan) 

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • इन्कम टॅक्स (फॉर्म नं 16)
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • सॅलरी स्लिप (3 महिने)
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
बँकेतून पर्सनल लोन कसे घ्यावे ?(How to get a personal loan)

बँकेकडून पर्सनल लोन घेणे खूप सोपे आहे,जसे आपण इतर कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन आपल्या बँकेच्या शाखेत जातो, त्याच पद्धतीने बँकेच्या शाखेत जाऊन या कर्जासाठी अर्ज करू शकतो.त्यामुळे जर तुम्हाला हे कर्ज बँकेमार्फत घ्यायचे असेल.तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन कर्जासाठी अर्ज करू शकता.

पाच मिनिटांत 1 एक लाख पर्यंत पर्सनल लोन मिळवा आपल्या मोबाईल वर

पर्सनल लोन ऑफर

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment