Free uniform : महाराष्ट्र राज्यातील येता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे.
आता स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय शाळांमधील मुलांना मोफत गणवेश वाटप करण्यात येणार असून या संदर्भात नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे तर पाहूया सविस्तर माहिती
Free school uniform scheme
महाराष्ट्र राज्य शासन निर्णयान्वये सन 2024 25 सालासाठी शैक्षणिक वर्षापासून समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत गणवेश वाटप करण्यात येतात.
सदरील योजनेसंदर्भात राज्य शासनाने बदल केलेला असून आता शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकसमान एक रंगाच्या दोन गणवेशांचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
मोफत गणवेश वाटप योजना
महाराष्ट्र राज्य शासन निर्णयामध्ये पुढीलप्रमाणे तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ज्याद्वारे महाराष्ट्रातील सर्व मुलांच्या गणवेश यामध्ये एकसूत्रीपणा येणार असून सदरील सूचना संपूर्ण राज्यासाठी लागू राहणार आहेत.
- इ.१ ली ते इ.४ थी पर्यंतच्या मुलींकरीता पिनो फ्रॉक (Pino Frock),
- इ.५ वी ते इ.७ वी पर्यंतच्या मुलींकरीता शर्ट व स्कर्ट
- इ.८ वी मधील मुलींकरीता सलवार-कमीज व ओढणी
- इ.१ ली ते इ.७ वीच्या मुलांकरीता हाफ पेंट व हाफ शर्ट
- इ.८ वी मधील मुलांकरीता फुल पेंट व हाफ शर्ट
सदर शुध्दिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०१२४१५२५१५९३२१ असा आहे. सदर शुध्दिपत्रक डिजीटल.