Family pension : सरकारी कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन (Family Pension) आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान मिळणार आहे.शासन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याला सेवा उपदान मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय दि.31/3/2023 निर्गमित करण्यात आला आहे.
कुटुंब निवृत्ती वेतन फॉर्म
कुटुंब निवृत्ती वेतन योजना नवीन शासन निर्णय निर्गमित झाला आहे.31 मार्च 2023 शासन निर्णया मधील कुटुंब तपशील नमुना-१ व 1982 सर्व कार्यरत NPS/DCPS धारक कर्मचारी /शिक्षक/अधिकारी यांनी फॅमिली पेंशन व ग्रॅच्युटी विकल्प नमुना-२ असे दोन्ही फॉर्म पूर्ण भरून स्वाक्षरी करून आपापल्या आस्थापना / विभाग प्रमुख कार्यालयात लवकरात लवकर जमा करायचे आहे.
Family pension pdf forms
मयत झालेल्या किंवा रुग्णता मुळे सेवा समाप्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी नमुना नं. – 3 भरून द्यायचा आहे.जेव्हा फॅमिली पेंशन ग्रॅच्युटी प्रस्ताव सादर करणार तेव्हा तो त्या प्रस्तावासोबत द्यावा लागणार आहे.
Employees Gratuity Documents
सर्व सेवानिवृत्त DCPS/NPS कर्मचाऱ्यांना विनाअट 15 लाख रुपये पर्यंत ग्रॅच्युटी मिळणार असल्याने त्यासाठी त्यांना ग्रॅच्युटी चा प्रस्ताव दाखल करावा लागेल.ग्रच्युटी प्रस्ताव नमूना लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
आजचा कुटुंब निवृत्ती वेतन शासन निर्णय येथे डाऊनलोड करा
फॅमिली पेंशन ग्रॅच्युटी चा प्रस्तावाचा नमुना लवकरच उपलब्ध होणार आहे.तोपर्यंत मयत कर्मचाऱ्यांचे मूळ मृत्यू दाखला,मूळ वारस प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे कुटूंबाने तयार ठेवावे.
कुटुंब निवृत्ती वेतन शासन निर्णय व फॉर्म येथे डाऊनलोड करा
3 thoughts on “Gratuity Family pension : कुटुंब निवृत्ती वेतन पेन्शन साठी एनपीएस धारकांनी भरायचे नमूने PDF स्वरूपात येथे करा डाऊनलोड करा”