ITR Filing : जर तुम्हीही दरवर्षी इन्कम टॅक्स विभागाला टॅक्स भरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.आयकर विभागाने करदात्यांसाठी एका मोबाइल ॲपची सुविधा सुरू केली असुन या ॲपच्या माध्यमातून करदात्यांना मोबाइलवर TDS सह वार्षिक माहिती विवरण म्हणजे AIS पाहता येणार आहे.
AIS Mobile App For tax payers
आयकर विभागाने करदात्यांसाठी AIS Mobile App हे एक असे मोबाइल अप्लिकेशन आहे,जे आयकर विभागाद्वारे विनामूल्य उपलब्ध केले जाते आणि गुगल प्ले आणि ॲप स्टोअरवरुन डाऊनलोड करू शकतो.या सुविधेमुळे करदात्यांना व्याज, लाभांश आणि शेअर व्यवहारांची माहिती मिळेल आणि या स्त्रोतावर बसणारा कर कपात करता येईल,असे प्राप्तिकर विभागाकडून सांगण्यात आले.
विविध स्त्रोतांकडून गोळा केलेली माहिती मिळवणे,करदात्यांना एआयएस / एआयएस प्रदान करणे, टीआयएस बद्दल माहिती देणे आणि कर भरण्यासंदर्भात विविध स्त्रोतांकडून गोळा केलेली माहिती हा ॲपचा उद्देश आहे.
मोबाईल ॲपवर मिळणार सर्व माहिती
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने एका निवेदनात म्हटले आहे की, “टीआयएसमध्ये टीडीएस / टीडीएस उपलब्ध टीसीएस, व्याज,लाभांश, शेअर व्यवहार, कर देयके, प्राप्तिकर परतावा यासह इतर गोष्टींशी संबंधित माहिती पाहण्यासाठी आपण या आयकर विभागाच्या मोबाइल ॲपचा वापर करू शकता.”
ॲपमध्ये दर्शविलेल्या माहितीला प्रतिसाद देण्याचा पर्याय आणि सुविधा देखील टॅक्सपेअरकडे आहे.करदात्यांना या मोबाइल ॲपद्वारे वार्षिक माहिती विवरण आणि इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये उपलब्ध असलेली माहिती पाहता येणार आहे.
इन्कम टॅक्स विभागाचे मोबाईल ॲप येथे डाऊनलोड करा