Government employees केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी महिन्याचा महागाई भत्ता लवकरच जाहीर होणार आहे.यावेळी कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याच्या घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तत्पूर्वी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी कडक इशारा दिला आहे.कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले,तर ते त्यांना जड जाऊ शकते. एवढेच नाही तर निवृत्तीनंतर पेन्शन आणि ग्रॅच्युइटीपासूनही वंचित राहावे लागू शकते.
नोकरीदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याने कामात निष्काळजीपणा केल्यास निवृत्तीनंतर त्याची पेन्शन आणि ग्रॅच्युइटी थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा आदेश केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू राहील.
यामुळे आता कामाबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच इतर प्रकरणात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी पासून प्रकरण संपेपर्यंत किंवा कायमचे वंचित राहावे लागणार आहे.
कर्मचारी वर्ग आता आणखी काटेकोरपणे आपली कर्तव्य बजावतील असे जाणकार सांगत आहेत.
राज्य कर्मचाऱ्यांना पण लागू होणार नियम!
सध्यास्थितीला केंद्र सरकारने साठी हा निर्णय घेतला असून लवकरच महाराष्ट्रात हा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतला जाऊ शकतो अशा प्रकारच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. सध्या तरी याबाबत राज्य सरकारने कोणतीच औपचारिक अशी घोषणा केली नाही.
केंद्र सरकारने ही नवीन नियमावली स्विकारली असल्याने राज्य शासन देखील ही नियमावली स्वीकृत करेल आणि अशा राज्य कर्मचाऱ्यांना देखील पेन्शन तसेच ग्रॅच्युटी पासून वंचित ठेवले जाऊ शकते असे सांगितले जाते आहे.
कोणत्या कर्मचाऱ्यांना नाही मिळणार पेन्शन आणि ग्रॅच्युयटी येथे पहा